नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणीशंकर अय्यर यांनी नारायण राणे यांना टोला लगावलाय. जे कॉंग्रेस सोबत इमानदारीने राहू शकत नाही. त्यांनी पहिल्यांदा काँग्रेसमध्ये येऊच नये.
कठीण काळात हे जातील पुन्हा चांगले दिवस आल्यावर परत येतील, असं अय्यर म्हणालेत. हिम्मत हारून विजयी झालेल्या लोकांमध्ये सहभागी होणं योग्य नाही, असं सांगायलाही ते विसरले नाहीत.
अय्यर यांनी मुंबईत झी 24 तासला ही प्रतिक्रीया दिली. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाणांचं मात्र कौतुक केलं.