राहुल गांधींच्या पदयात्रेत खिसेकापूंचा फायदा

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काल निघालेल्या पदयात्रेत कुणाचा होवो न होवो पण खिसेकापूंचा चांगलाच फायदा झालाय.

Updated: Jan 17, 2016, 01:56 PM IST
राहुल गांधींच्या पदयात्रेत खिसेकापूंचा फायदा  title=

मुंबई : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काल निघालेल्या पदयात्रेत कुणाचा होवो न होवो पण खिसेकापूंचा चांगलाच फायदा झालाय.

वांद्रे ते धारावी दरम्यान निघालेल्या पदयात्रेत काँग्रेसनेत्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्याप्रमाणावर हजेरी लावली या पदयात्रेत अनेक नेत्यांच्या मोबाईल फोनवर चोरट्यांनी डल्ला मारलाय.

माजी खासदार मिलिंद देवरा, आमदार अस्लम शेख आणि अमिन पटेल यांच्यासह वीस कार्यकर्त्यांनी मोबाईल हरवल्याची तक्रार पोलिसांत दाखल केलीये.