संतापजनक: मुंबईत मराठी माणसालाच घर विकण्यास नकार

मुंबईत झिशान खान आणि मिसबाह यांची धर्मभेदाची उदाहरणं ताजी असतांनाच, आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आता तर चक्क मराठी तरुणालाच मुंबईत घर विकण्यास नकार देण्यात आला आहे. 

Updated: May 30, 2015, 06:51 PM IST
संतापजनक: मुंबईत मराठी माणसालाच घर विकण्यास नकार title=

मुंबई: मुंबईत झिशान खान आणि मिसबाह यांची धर्मभेदाची उदाहरणं ताजी असतांनाच, आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आता तर चक्क मराठी तरुणालाच मुंबईत घर विकण्यास नकार देण्यात आला आहे. 

मुंबईतील मालाडमधील 'द श्रीनाथजी ग्रुप ऑफ डेव्हलपर्स'ने वैभव रहाटेला फ्लॅट विकण्यास नकार दिला आहे. मालाडमध्ये बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी वैभव घर पाहण्यास गेला होता. मात्र या बिल्डरच्या ऑफिसमध्ये त्याला असं सांगण्यात आलं की, आम्ही महाराष्ट्रीयन, मुस्लिम आणि इतर मांसाहारी कुटुंबीयांना घर विकत नाही. फक्त गुजराती आणि मारवाडी कुटुंबांनाच घर विकतो. 

या घटनेला 15 दिवस होऊन गेली असल्याने पोलिसांनीही वैभवची तक्रार घेण्यास नकार दिला. मात्र वैभव आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी मालाड पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन केलं, त्यानंतर पोलिसांची वैभवची तक्रार दाखल करुन घेतली. 

'द श्रीनाथजी ग्रुप ऑफ डेव्हलपर्स'ने वैभवने केलेले सर्व आरोप फेटाळत आरोपांत तथ्य नसल्याचे सांगितले आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.