मुंबई : उद्योगमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीकडे मेटल व्यापा-यांनी पाठ दाखविली आहे. कर चुकवण्यासाठीच गुजरातेत स्थलांतराची धमकी दिल्याचं उघड झाले आहे. चुकीच्या गोष्टींपुढे न झुकण्याची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बाणेदार भूमिका घेतली आहे.
मुंबईतील मेटल व्यापाऱ्यांनी गुजरातला स्थलांतरित होण्याची धमकी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्योग राज्यमंत्री प्रविण पोटे यांनी मंत्रालयात मेटल व्यापाऱ्यांची बैठक बोलवली. मात्र थातूरमातूर कारणं देऊन व्यापाऱ्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. यावरुन मेटल व्यापाऱ्यांना चुकीच्या गोष्टी लपवायच्या आहेत असा संशय उद्योग राज्यमंत्री प्रविण पोटे यांनी व्यक्त केलाय.
राज्य सरकार मेक इन महाराष्ट्रसाठी उद्योगपती आणि व्यापाऱ्यांना योग्य ते सहकार्य करेल. मात्र चुकीच्या गोष्टींसाठी सूट देणार नाही असंही पोटे यांनी स्पष्ट केलंय. या व्यापाऱ्यांकडे १० हजार कोटी रुपयांची विक्रीकर थकबाकी आहे. तर हवाला प्रकरणातही काही व्यापारी गुंतले आहेत. दरम्यान विक्रीकर थकबाकी ही करचोरी समजली जाईल असंही उद्योगमंत्री प्रवीण पोटे यांनी स्पष्ट केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.