मेट्रो 3 प्रकल्प घेतोय मैदानं, उद्यानांचा जीव

हा मोठा मोकळा भूखंड वाचवण्यासाठी दादर प्रभादेवीवासीय एकत्र आलेत..नर्दुला टॅंक मैदान बचाव समितीची स्थापना करण्यात आली आहे.

Updated: Dec 11, 2016, 07:52 PM IST
मेट्रो 3 प्रकल्प घेतोय मैदानं, उद्यानांचा जीव title=

मुंबई : मेट्रो 3 प्रकल्पासाठी प्राधिकरणाने प्रभादेवी इथलं पालिकेचे नर्दुल्ला टॅंक मैदान आणि साने गुरुजी उद्यानाची जागा ताब्यात घेऊन काम सुरु केलं आहे. त्यामुऴं इथला खेळ आणि नागरिकांच्या मोकळ्या श्वासाला फटका बसलाय. 

हा मोठा मोकळा भूखंड वाचवण्यासाठी दादर प्रभादेवीवासीय एकत्र आलेत..नर्दुला टॅंक मैदान बचाव समितीची स्थापना करण्यात आली आहे.

सकाळी स्थानिक रहिवाशांनी शांततेच्या मार्गाने प्रकल्पाच्या कामाला विरोध केला. स्थानिक रहिवाशी आणि युवा खेळाडू यांनी मैदानात मानवी साखळी करुन आपली एकजूट आणि प्रकल्पाविरोधातला रोष व्यक्त केला आहे.