मुंबई : नवीन वर्षाची भेट म्हाडा देणार आहे. म्हाडा जवळपास ४,७०० घरांची लॉटरी काढणार आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत या फ्लॅटच्या किमती सरासरी ५० हजार ते दीड लाखांनी कमी असणार आहेत.
मुंबई आणि मुंबई उपनगरात हक्काच्या घरांसाठी अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या नागरिकांसाठी खूशखबर म्हाडाने दिलेय. विरारमध्ये ३ हजार, मुंबईत १ हजार आणि ठाण्यात ७०० घरे नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहेत.
मुंबईत एक हजार, ठाण्यात ७०० तर विरार-बोळींज या ठिकाणी ३ हजार घरांच्या प्रकल्पाचे काम मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले आहे. येत्या महिनाअखेरीस त्याबाबतचे अंतिम नियोजन केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रतिवर्षाप्रमाणे ३१ मे रोजी लॉटरी काढली जाईल, असे सांगण्यात आलेय.
म्हाडाची घरे महाग असल्याने नाराजी होती. आता विविध उत्पन्न गटातील घरांच्या गेल्या वर्षाच्या किमतीपेक्षा सरासरी ५० हजार ते दीड लाख रुपयांपर्यंतचे दर कमी असणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.