मुंबईतील ९९७ म्हाडा घरांची सोडत रविवारी

मुंबईच्या विविध भागांतील ९९७ सदनिकांची सर्वसाधारण लॉटरी आणि विकलांग अर्जदारांसाठी ६६ सदनिकांची विशेष लॉटरी उद्या वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात काढण्य़ात येणार आहे.

Updated: May 30, 2015, 10:22 AM IST
मुंबईतील ९९७ म्हाडा घरांची सोडत रविवारी title=
छाया - डीएनए

मुंबई : मुंबईच्या विविध भागांतील ९९७ सदनिकांची सर्वसाधारण लॉटरी आणि विकलांग अर्जदारांसाठी ६६ सदनिकांची विशेष लॉटरी उद्या वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात काढण्य़ात येणार आहे.

सुट्टीच्या दिवसामुळे सभागृहात अर्जदारांची गर्दी होण्याची शक्यता असतानाच, गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही 'वेबकास्ट लाइव्ह'द्वारे थेट प्रक्षेपणाची सुविधा म्हाडाने उपलब्ध केली आहे. लॉटरीच्या कार्यक्रमाला गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्यासह स्थानिक खासदार आणि आमदार उपस्थिती राहणार आहेत.

लॉटरीचा निकाल पाहण्यासाठी सभागृहात अधिक गर्दी झाल्यास दरवर्षीप्रमाणे सभागृहाबाहेरच्या मंडपात मोठ्या पडद्यावर निकाल दाखवण्याची सोय असेल. त्याशिवाय अर्जदारांना घरबसल्या लॉटरी पाहता यावी यासाठी 'वेबकास्ट लाइव्ह'चीही सुविधा असेल. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x