www.24taas.com, मुंबई
म्हाडाने २०१३ च्या सोडतीची तयारी सुरू केली असून सोडतीत किती घरांचा समावेश होईल याचा आजच्या म्हाडाच्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत आढावा घेण्यात आला.
त्यानुसार २०१३ ची सोडत सुमारे ४००० घरांसाठी फुटणार असल्याचे म्हाडाच्या वतीने सांगण्यात आले.
या मुंबई मंडळातील १५०० तर कोकण मंडळातील २५४४ घरांचा समावेश असणार असल्याचेही गवई यांनी सांगितले आहे. दरम्यान ऐनसोडतीच्या वेळेस घरांच्या आकडेवारीत बदल करण्याचा म्हाडाचा आजवरचा अनुभव पाहता या आकडेवारीतही एप्रिलपर्यंत बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
काय आहे या लॉटरीची वैशिष्ट्ये
- लॉटरीतील अंदाजित घरे-४०००
- मुंबई मंडळातील घरे १५००
- पवईतील घरे ६००
- उर्वरित ठिकाणची घरे ९००
- कोकण मंडळाची घरे २५४४
- विरारमधील घरे-२४४४
- यातील अल्प गटासाठीची घरे १८२४
- मध्यम गटातील घरे ६२०
- वेंगुर्ल्यातील घरे १००
- अंदाजे २० घरे उच्च वर्गासाठी उर्वरित अल्प आणि मध्यम गटासाठी