www.24taas.com, मुंबई
मंत्रालयाला पुन्हा एकदा भीषण आग लागली. ही आग चौथ्या मजल्याला लागली आहे. याआधी चौथ्या मजल्यावर २१ जून २०१२ रोजी मंत्र्यालयाला २.४० मिनिटांनी लागही आग होती.
मंत्रालयाच्या आगीचे नेमक कारण समजलं नसलं तरी ही आग शॉर्टसर्कीटने लागल्याचे सांगण्यात येत आहे. चौथ्या मजल्यावरील आग विझविण्याचा प्रयत्न सुरू सुरू आहे. घटनास्थळी तीन अग्निशमन दलासाठी गाड्या तातडीने रवाना झाल्या आहेत. ही विस्तारीत बिल्डींगच्या चौथ्या मजल्याला आग लागली आहे.
चौथ्या मजल्याचे नुतनीनकरणाचे काम सुरू होते, त्यातील काही साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. चौथ्या मजल्यावर काहीही साहित्य नसल्याने नुकसान टळलेय. आज दुसरा शनिवार असल्याने कर्मचाऱ्यांना सुट्टी होती. त्यामुळे आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.