मुंबई : ऐ दिल है मुश्किल चित्रपटाच्या निषेधार्थ निवेदन देणा-या मनसे कार्यकर्त्यांची अटक मुंबई पोलिसांच्या अंगलट आलीय. मनसे कार्यकर्त्यांची अटक ही चुकीची असून पोलिसांनी कलम १५१ नुसार केलेली कारवाई योग्य नसल्याचे सांगत सर्व १२ मनसे कार्यकर्त्यांची तात्काळ सुटका केली.
पाकिस्तानी कलाकार असलेले चित्रपट प्रद्रशित करु नका हे निवेदन देणा-या मनसेच्या १२ कार्यकर्त्यांना मुंबई पोलीसांनी अटक केली होती.
ते प्रकरण मुंबई पोलीसांच्या चांगलच अंगलट आलंय, संच संपूर्ण प्रकरणच न्यायालयाने रद्द बातल ठरवलय. एवढंच नाही तर पोलीस कायद्याचा कसा गैरवापर करतात त्याचे आणखी एक उदाहरण असल्याचं सांगत मुंबई पोलिसांना न्यायालयानं फटकारलंय. मुंबई सत्र न्यायालयाने हे आदेश दिलेत.