मुंबई : मनसे मराठी पाट्यांच्या मुद्दयावर पुन्हा आक्रमक झालीय. कांदीवली मधल्या चारकोप भागात मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन करत दुकानांच्या इंग्रजी पाट्या फोडल्या.
इंग्रजी पाट्यांवर दगडफेक केली. मनसे उपाध्यक्ष नयन कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. पक्षाची स्थापना करण्यात आली त्यावेळी मनसेने मराठीचा मुद्दा लावून धरला होता.
दुकानावरील पाट्या ह्या मराठीत असल्या पाहिजेत असा आग्रह धरला होता. तसेच विधानसभा निवडणूक मराठीच्या मुद्द्यावर लढविली होती. पहिल्याच निवडणुकीत मनसेचे ११ आमदार निवडून आले होते.