मनसेच्या रेल्वे इंजिनाच्या बदललेल्या दिशेला मान्यता

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षचिन्ह असलेल्या रेल्वे इंजिनाच्या बदललेल्या दिशेला आता केंद्रीय निवडणूक आयोगानंही मान्यता दिली आहे. 

Updated: Dec 25, 2016, 08:23 AM IST
मनसेच्या रेल्वे इंजिनाच्या बदललेल्या दिशेला मान्यता title=

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षचिन्ह असलेल्या रेल्वे इंजिनाच्या बदललेल्या दिशेला आता केंद्रीय निवडणूक आयोगानंही मान्यता दिली आहे. 

पक्षाला 19 डिसेंबरला पाठवलेल्या पत्रातून तसं आयोगानं कळवलं आहे. त्यामुळे आता मनसेचे इंजिन उजवीकडून डावीकडे धावण्याच्या दिशेवर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झालं आहे. 

याआधी मनसेची निशाणी असलेले हे रेल्वे इंजिन डावीकडून उजवीकडे धावण्याच्या दिशेने दाखवण्यात आले होते.