दुष्काळग्रस्त भागांना मनसेची मदत

दुष्काळग्रस्त भागात तातडीने चारा छावण्या उभारण्याचे आदेश, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिका-यांना दिले आहेत. औरंगाबाद,. जालना, बीड, सोलापूरमध्ये दुष्काळग्रस्त भागात तातडीने मदत यंत्रणा कार्यरत होणार आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 6, 2013, 09:46 PM IST

www.24taas.com, मुंबई
दुष्काळग्रस्त भागात तातडीने चारा छावण्या उभारण्याचे आदेश, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिका-यांना दिले आहेत. औरंगाबाद,. जालना, बीड, सोलापूरमध्ये दुष्काळग्रस्त भागात तातडीने मदत यंत्रणा कार्यरत होणार आहे.
चारा छावण्यांसाठी स्थानिक पदाधिका-यांना पक्षाकडून आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. चारा छावण्यांच्या नियोजनाची जबाबदारी पदाधिका-यांची असणार आहे. सरकारी मदतीला सामांतर यंत्रणा मनसे उभारणार आहे. १५ मार्चपासून मनसेच्या या मदतकार्याला सुरूवात होणार आहे. चारा छावण्यांसाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांना पक्षाकडून आर्थिक सहाय्य केलं जाणार आहे. या चारा छावण्यांची जबाबदारी संबंधित पदाधिकाऱ्यांकडे असेल. एक हजार गुरांच्या एका छावणीसाठी मासिक खर्च अंदाजे ३० ते ४५ लाख रुपये इतका असतो. या छावण्यांसाठी मनसे मदत करणार आहे.

दुष्काळी भागात राज ठाकरेंच्या दौ-यानंतर दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राज ठाकरेंनी बैठक बोलावली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला.