अल्पवयीन मुलीला सहा लाखांना विकत घेऊन लग्न

अल्पवयीन मुलीला सहा लाखांना विकल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यामध्ये घडली आहे. 

Updated: Jul 25, 2016, 07:47 PM IST
अल्पवयीन मुलीला सहा लाखांना विकत घेऊन लग्न title=

ठाणे : अल्पवयीन मुलीला सहा लाखांना विकल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यामध्ये घडली आहे. सावत्र आईनं या मुलीला लाचाराम क्रिपाराम चौधरीला सहा लाखांना विकलं. या मुलीशी लाचारामनं लग्न केलं आणि तिला नालासोपाऱ्याला घेऊन आला. 

ही मुलगी तेरा वर्षांची आहे, पण कागदावर मात्र तिचं वय 20 दाखवण्यात आलं आहे. या मुलीला लाचारामनं एका खोलीमध्ये बंधक बनवून ठेवलं होतं. गेल्या दहा महिन्यांपासून लाचारामनं लैंगिक, शारीरीक आणि मानसिक अत्याचार केल्याचं या पीडित मुलीनं पोलिसांना सांगितलं आहे. 

लाचारामकडून होणारे अत्याचार सहन न झाल्यामुळे ही मुलगी पोलीस स्टेशनमध्ये आली आणि हा सगळा प्रकार तिनं सांगितला. या मुलीच्या आईचं निधन झाल्यानंतर वडिलांनी दुसरं लग्न केलं, यानंतर सावत्र आईनं तिला विकलं.