मुंबई पालिका नगरसेवकांना मोबाईल देणार

मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांसाठी आणखी एक चांगली बातमी आहे. मुंबई महापालिका नगरसेवकांना आता जनसेवेसाठी मोबाईल मिळणार आहे.

Updated: Feb 7, 2013, 12:37 PM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांसाठी आणखी एक चांगली बातमी आहे. मुंबई महापालिका नगरसेवकांना आता जनसेवेसाठी मोबाईल मिळणार आहे. या मोबाईचा सर्व खर्च महापालिकेच्या तिजोरीतून होणार आहे. अशा आशायाचा ठराव मुंबई महापालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत करण्यात आला आहे.
यासाठी २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. नगरसेवकांचं महिन्याचं साडे बाराशे रुपयांचं बील महापालिका भरणार आहे. नगरसेवकांना देण्यात येणारे हे मोबाईल अत्याधुनिक असणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या मोबाईलवरुन फोटोही अपलोड करता येणार आहेत.
यापूर्वीच नगरसेवकांना लॅपटॉप घेऊन देण्यात आले आहेत. मात्र काही नगरसेवकांनी त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही ते लॅपटॉप परत केले नव्हते. त्यानंतर आता मोबाईलही देण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे.