'राधे माँ'चा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू राधे माँचा अटकपूर्व जामीन दिंडोशी कोर्टानं फेटाळलाय. त्यामुळं हा राधे माँसाठी मोठा झटका मानला जातोय.

Updated: Aug 13, 2015, 11:02 PM IST
'राधे माँ'चा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला title=

मुंबई: स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू राधे माँचा अटकपूर्व जामीन दिंडोशी कोर्टानं फेटाळलाय. त्यामुळं हा राधे माँसाठी मोठा झटका मानला जातोय.

हुंड्यासाठी छळ केलाचा आरोप निकी गुप्ता या महिलेनं राधे माँ विरुद्ध केलाय. तसंच तशी तक्रारही दाखल केलीय. मुंबई पोलिसांनी राधे माँला समन्स बजावलं असून शुक्रवारी तिची चौकशी केली जाणार आहे. 

मुंबई पोलिसांनी सहा जणांना समन्स बजावलं असून यात राधे माँसह संजीव गुप्ता आणि कुटुंबीय आहेत. निकी गुप्ता या संजीव गुप्ताची सून असून तिनं तक्रार केलीय की संपूर्ण गुप्ता कुटुंब राधे माँचे भक्त आहेत. राधे माँच्या सांगण्यावरुन सासरची मंडळी छळ करत असल्याचं सूनेनं म्हटलं आहे. कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये पीडित महिलेनं तक्रार दाखल केलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.