मालवणी दारू कांडानंतर पोलिसांना आली जाग, मृतांचा आकडा ९८ वर

मालवणी विषारी दारुकांडात ९७ जण मृत्यूमुखी पडल्यानंतर पोलिसांना खडबडून जाग आली आहे. त्यामुळंच गेल्या तीन दिवसात मुंबई पोलिसांनी विविध ठिकाणी हात भट्टया आणि गावठी दारू विकणाऱ्यांवर छापा टाकून ३४ गुन्हे दाखल केलेत.

Updated: Jun 22, 2015, 04:59 PM IST
मालवणी दारू कांडानंतर पोलिसांना आली जाग, मृतांचा आकडा ९८ वर  title=

अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई : मालवणी विषारी दारुकांडात ९७ जण मृत्यूमुखी पडल्यानंतर पोलिसांना खडबडून जाग आली आहे. त्यामुळंच गेल्या तीन दिवसात मुंबई पोलिसांनी विविध ठिकाणी हात भट्टया आणि गावठी दारू विकणाऱ्यांवर छापा टाकून ३४ गुन्हे दाखल केलेत.

या प्रकरणात जवळपास ५० लोकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन तपास सुरु केला आहे. मुंबईतील गोरेगाव, जोगेश्वरी, मालवणी, दहिसर या ठिकाणच्या झोपडपट्टीत गेल्या अनेक वर्षांपासून हातभट्टया, गावठी दारू सर्रास विकली जाते. मात्र, स्थानिक पोलीस याकडे दुर्लक्ष किंवा हप्ता घेऊन चालढकल करताना दिसातात. 

पण, मालवणी प्रकरणात ९८ जण मृत्यूमुखी पडले असून ४८ जणांवर अजूनही उपचार सुरू आहे. यानंतर पोलीस कारवाईला सुरुवात झाली आहे. ही कारवाई यापूर्वीच केली असती तर आज ९८ कुटुंबांचा संसार उघड्यावर आला नसता, अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.