पाकिस्तानात अटक केलेला भारतीय 'सिमी'चा कार्यकर्ता?

पाकिस्ताने अटक केलेला भारतीय नागरीक हा 'सिमी'चा संशयीत कार्यकर्ता असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केलाय.  

Updated: May 23, 2017, 11:20 AM IST
पाकिस्तानात अटक केलेला भारतीय 'सिमी'चा कार्यकर्ता? title=

मुंबई : पाकिस्ताने अटक केलेला भारतीय नागरीक हा 'सिमी'चा संशयीत कार्यकर्ता असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केलाय.  

नबी अहमद शेख असं त्याचे नाव असून नबी हा गेल्या १२ वर्षांपासून बेपत्ता होता. मुंबईतल्या जोगेश्वरी येथे राहणारा नबी शेख याला काही महत्वाच्या कागदपत्रांची पूर्तता नसल्यानं अटक झाली करण्यात आल्याचं म्हटलं जातंय. 

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील एफ - ८ भागातून त्याला अटक करण्यात आलीय. पाकिस्तानी मीडियानं याबाबत जोरदार बातम्या चालवल्या आहेत. पण पाकिस्तान दूतावासचे उच्चायुक्त मात्र अशी कोणती माहिती नसल्याचं सांगत आहेत. 

दरम्यान, महाराष्ट्र एटीएसने दिलेल्या माहितीनुसार नबी शेख हा २००५-२००६ साली सिमीच्या संपर्कात होता. त्यामुळे तपास यंत्रणांच्या हाती येऊ नये याकरता तो पाकिस्तानात पळून गेला असावा, असा संशयही एटीएसनं व्यक्त केलाय.

पाकिस्ताननं अटक केलेला नबी शेख हा एटीएसच्या रेकॉर्डमध्ये असलेला नबी शेखच आहे का? याचादेखील तपास केला जातोय. 
त्यामुळे नबी शेखची अटक ही पाकिस्तानसाठी चांगली गोष्ट आहे का वाईट? याचा अंदाज पाकिस्तान लावू शकत नाहीय. 

आंतरराष्ट्रीय कोर्टानं पाकने कुलभूषण जाधवांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर लगेचच पाकने आणखी एका भारतीय नागरिकाला अटक केलीय.