मुंबई मॅरेथॉनवर केनियन धावपटूंचं वर्चस्व

13 व्या मुंबई मॅरेथॉनवर या वर्षीय केनियन धावपटूंचं वर्चस्व पहायला मिळालं. 42 किलोमीटरच्या मुख्य मॅरेथॉनमध्ये केनियाच्या गिगिआन केपिकेटरनं बाजी मारली.  

Updated: Jan 17, 2016, 12:58 PM IST
मुंबई मॅरेथॉनवर केनियन धावपटूंचं वर्चस्व title=

मुंबई :  13 व्या मुंबई मॅरेथॉनवर या वर्षीय केनियन धावपटूंचं वर्चस्व पहायला मिळालं. 42 किलोमीटरच्या मुख्य मॅरेथॉनमध्ये केनियाच्या गिगिआन केपिकेटरनं बाजी मारली. तर भारतीय गटात नरेंद्रसिंग रावतनं अव्वल क्रमांक पटकावला. त्यानं 2 तास 15 मिनिटं आणि 48 सेकंदात फुल मॅरेथॉन पूर्ण केली. 

गोपी आणि खेताराम अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. दुसरी वुमेन्स फुल मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राच्या ललिता बाबरला दुस-या क्रमांकावर समाधान मानाव लागलं. सुधा सिंगनं अव्वलस्थान पटकावलं. सुधा सिंगनं 2 तास 39 मिनिटं आणि 28 सेकंदांची वेळ नोदंवली. 

मुंबई मॅरेथॉनबाबतच्या इतरही घडामोडी संक्षिप्त स्वरुपात

1) हाफ मॅरेथॉनमध्ये महिला गटात मराठी मुलींना बाजी मारली मोनिका राऊत पहिली, मनिषा साळुंखे दुसरी तर मोनिरा आथरेनं तिसरा क्रमांक पटकावला.

2) हाफ मॅरेथॉनच्या पुरुष गटात दीपक बाबू कुमार पहिला आला. त्याने एक तास 6 मिनिटे एक सेकंदात हे अंतर पार केलं..

3) धावण्याला वय नाही हेच चित्र मुंबई मॅरोथन मध्ये दिसलं. 13व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये तरुणांसोबत वयस्कर नागरीकही तेवढ्यात उत्साहात सहभागी झाले...

4) मुंबई मॅरेथॉन प्रसिद्ध आहे ती यातून दिल्याजाणा-या सामाजीक संदेशांसाठी. यावर्षीही मॅरोथनमध्ये सामाजिक संदेश देणारे पोस्टर दाखवण्यात आले... पक्षी, वन संवर्धन, शिक्षण, धार्मिक संदेशही यातून देण्यात आले.