मुंबई महापौरपदाची निवडणूक : मनसेचा व्हीप मागे, आता काय होणार?

 मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक आज होते आहे. या निवडणुकीत मनसेची भूमिका महत्वाची ठरणार होती. मात्र, जारी केलेला व्हीप मागे घेत नगरसेवकांना अनुपस्थित राहण्याचा सल्ला घेण्यात येत आहे.

Updated: Sep 9, 2014, 12:49 PM IST
मुंबई महापौरपदाची निवडणूक : मनसेचा व्हीप मागे, आता काय होणार? title=

मुंबई : मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक आज होते आहे. या निवडणुकीत मनसेची भूमिका महत्वाची ठरणार होती. मात्र, जारी केलेला व्हीप मागे घेत नगरसेवकांना अनुपस्थित राहण्याचा सल्ला घेण्यात येत आहे.

शिवसेनेच्या नगरसेविका स्नेहल आंबेकर यांनी महापौरपदाचा अर्ज भरलाय. महिला अनुसूचित जातीसाठी महापौरपद राखीव आहे.  तर उपमहापौरपदासाठी भाजपच्या अलका केरकर यांनी अर्ज भरलाय. काँग्रेसतर्फे प्रियतमा सावंत आणि उपमहापौरपदासाठी राष्टृवादीचे चंदन शर्मा यांनी अर्ज भरलाय. या निवडणुकीत मनसे नगरसेवकांना उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी करण्यात आला होता. त्यामुळे ब-याच काळानंतर मनसे नगरसेवक निवडणुकीच्या वेळी सभागृहात उपस्थित राहणार होते.

असं असलं तरी मनसे दबावाचं राजकारण करत असल्याचा आरोप करण्यात आला. कारण मनसे मतदान कोणाला करणार हे मात्र अजून गुलदस्त्यातच होतं. त्यातच शिवसेना भाजप युतीत काही नगरसेवक यावेळी अनुपस्थित राहणार असल्याची भिती ही व्यक्त केली जातेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.