व्हिडिओ : उष्णतेमुळे स्वाईन फ्लू बळावला... महापौरबाईंचा जावई शोध!

कोणतीही माहिती न घेता अर्धवट माहितीच्या आधारे बडबडण्यासाठी फेमस असलेल्या शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर पुन्हा एकदा वादात अडकल्यात. यावेळी, त्यांनी स्वाईन फ्लूसारख्या गंभीर आजाराबद्दलचं अज्ञान उघड केलंय. 

Updated: Feb 19, 2015, 02:16 PM IST
व्हिडिओ : उष्णतेमुळे स्वाईन फ्लू बळावला... महापौरबाईंचा जावई शोध! title=

मुंबई : कोणतीही माहिती न घेता अर्धवट माहितीच्या आधारे बडबडण्यासाठी फेमस असलेल्या मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर पुन्हा एकदा वादात अडकल्यात. यावेळी, त्यांनी स्वाईन फ्लूसारख्या गंभीर आजाराबद्दलचं अज्ञान उघड केलंय. 

'वातावारणात बदल झाल्यानं मुंबईत स्वाईन फ्लू वाढतोय. बरीच यंत्रणा याकरता राबत आहे. यावर उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याचा उपक्रम पालिकेनं हाती घेतलाय' असं स्नेहल आंबेकर यांनी म्हटलंय. इतक्यावरच महापौरबाई थांबल्या नाहीत, तर आपलं अज्ञान आणखीन उघड करत 'वातावरणात एकाएकी उष्णता वाढली की स्वाईन फ्लू सारखे रोग पसरतात' असंही त्यांनी म्हटलंय. 

महत्त्वाचं म्हणजे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, स्वाईन फ्लू हा उष्णता वाढल्यामुळे पसरतोय, असं म्हणणं चुकीचं आहे. याउलट, थंड वातावरणात स्वाईन फ्लू अधिक बळावण्याची शक्यता असते. नागपूर भागातदेखील थंड वातावरणामुळे स्वाईन फ्लूचे रुग्ण बळावल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.  

'झी 24 तास'नं ही चूक महापौरबाईंच्या लक्षात आणून दिल्यानंतर आणि स्वाईन फ्लू आणि झाडं लावण्याचा संबंध काय आहे? याबद्दल स्पष्टीकरण विचारल्यानंतर मात्र आंबेकरांना आता काय बोलावं? हेच सुचलं नाही.  

महापौर स्नेहल आंबेकरांची बेताल वक्तव्य
यापूर्वीही, मुंबईमध्ये डेंग्यूचा प्रादूर्भाव वाढत असताना महापौर स्नेहल आंबेकरांनी 'हा मीडियानं मोठा केलेला आजार' असल्याचं म्हटलं होतं. यावेळीही, स्नेहल आंबेकर यांनी डेंग्यू हा साधा आजार असल्याचा जावईशोध लावला होता. 

व्हिडिओ पाहा :-

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.