मुंबई मेट्रो ३ : शिवसेनेने काँग्रेसचा 'हात' पकडत भाजपचा केला गेम

शहरातील परिवहन व्यवस्था आमूलाग्र बदलून टाकण्याची क्षमता असलेल्या मेट्रो-३ प्रकल्पाचा डेपो अखेर आरे कॉलनीतच होणार होता. मात्र, शिवसेनेने काँग्रेसचा 'हात' पकडत या प्रकल्पाला खो घालत भाजपचा गेम केला.

Updated: Mar 16, 2016, 07:47 PM IST
मुंबई मेट्रो ३ : शिवसेनेने काँग्रेसचा 'हात' पकडत भाजपचा केला गेम title=

मुंबई : शहरातील परिवहन व्यवस्था आमूलाग्र बदलून टाकण्याची क्षमता असलेल्या मेट्रो-३ प्रकल्पाचा डेपो अखेर आरे कॉलनीतच होणार होता. मात्र, शिवसेनेने काँग्रेसचा 'हात' पकडत या प्रकल्पाला खो घालत भाजपचा गेम केला.

मेट्रो-३ च्या डेपोसाठी कांजूरमार्ग येथे पर्यायी जागा सुचवण्यात आली होती. मात्र या जागेबाबत काहीच निर्णय झाला नसल्याने अखेर आता मुंबई मेट्रोरेल प्राधिकरण आरे कॉलनीतील जागेसाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवणार होती. या डेपोचा मूळ आराखडा बदलण्यात आला असून घनदाट झाडी असलेला भाग वगळून उर्वरित २४ हेक्टर भागात डेपो उभारला जाणार होता.

मुंबई पालिकेत शिवसेना-भाजपची सत्ता असली तरी दोघांचे पटत नाही, असेच चित्र आहे. मुंबई मेट्रो ३ला मुंबई महापालिकेने खो घातलाय. १७ भूखंड देण्याचा प्रस्ताव पालिका सभागृहाने केला रद्द केलाय. यासाठी शिवसेनेने काँग्रेसला सोबत घेवून भाजपचा गेम केला.

भाजपने सुधार समितीत शिवसेनेचा विरोध डावलून काँग्रेसच्या सहमतीने प्रस्ताव पास केला होता. त्यामुळे भाजप शिवसेनेवर कुरघोडी करण्यात यशस्वी झाली होती. मात्र, भाजपला चांगला धडा शिकविण्यासाठी शिवसेनेने जोरदार मोर्चेबांधणी केली. दरम्यान, दोन्ही ठिकाणी काँग्रेसची भूमिका बदलेली दिसून आली. काँग्रेस नेता बदल्याचा फायदा शिवसेनेने उचलत भाजपला खिंडीत पकडलेय. त्यामुळे मुंबई मेट्रो ३ रखडणार असल्याचे चित्र दिसत आहे.