धक्कादायक : मॉडेल बलात्कार, तीन पोलिसांसह सहा अटकेत

मुंबईत मॉडेलवरील बलात्कार प्रकरणी तीन पोलिसांसह सहा जणांना अटक करण्यात आलीय.. 

Updated: Apr 24, 2015, 09:49 AM IST
धक्कादायक : मॉडेल बलात्कार, तीन पोलिसांसह सहा अटकेत  title=

मुंबई : मुंबईत मॉडेलवरील बलात्कार प्रकरणी तीन पोलिसांसह सहा जणांना अटक करण्यात आलीय.. 

पीडित महिलेनं या अत्याचाराबाबत मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्याकडे न्याय मागितला... 

या घटनेबाबत तिनं एसएमएस करुन मारिया यांना माहिती दिली.. त्यानंतर मारिया यांनी या महिलेला आपल्या ऑफिसमध्ये बोलावून प्रकरण जाणून घेतलं..

याप्रकरणी मारिया यांनी या घटनेचा तपास क्राईम ब्रांचकडे सोपवला.. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन सहा जणांना अटक केलीय.. 

सीसीटीव्ही  फुटेजच्या आधारे याप्रकरणाचा तपास सुरु आहे.. दरम्यान याबाबत मुंबई क्राइम ब्रांचनं मौन बाळगलंय.. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.