पोलिसांकडून ISISचा प्रवक्ता होऊ इच्छिणाऱ्या पत्रकाराचा शोध सुरू

मुंबई पोलिस सध्या एका पत्रकाराच्या शोधात आहेत, कारण दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचा प्रवक्ता बनण्याची इच्छा या पत्रकाराची आहे, अशा कथित पत्रकाराच्या शोधात मुंबई पोलिस आहेत.

Updated: Aug 6, 2015, 04:06 PM IST
पोलिसांकडून ISISचा प्रवक्ता होऊ इच्छिणाऱ्या पत्रकाराचा शोध सुरू title=

मुंबई : मुंबई पोलिस सध्या एका पत्रकाराच्या शोधात आहेत, कारण दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचा प्रवक्ता बनण्याची इच्छा या पत्रकाराची आहे, अशा कथित पत्रकाराच्या शोधात मुंबई पोलिस आहेत.

एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार, जुबैर अहमद खान नावाच्या या माणसाने, याकूब मेमनला फाशी दिल्यानंतर, सोशल नेटवर्किंगवरील आपल्या पोस्टवर लिहिलंय की, आपल्याला भारताचं नागरिकत्व सोडायचं आहे, आणि इस्लामिक स्टेट सोबत काम कराचंय.

इंग्रजी दैनिकाच्या बातमीनुसार या व्यक्तीने सोशल नेटवर्किंग साईटवर लिहलंय की, त्याला इस्लामिक स्टेटचा प्रवक्ता होण्याची इच्छा आहे. या व्यक्तीने आपण पत्रकार असल्याचा देखील दावा केला आहे. मंगळवारी पोलिसांनी या व्यक्तीला शोधण्यासाठी वांद्रे गाठलं होतं, पण हा व्यक्ती पोलिस येण्याआधी फरार झाला.

क्राईम ब्रांचच्या लोकांना विश्वास आहे की, जुबैर अहमद खान नावाचा हा व्यक्ती नवी मुंबईचा रहिवाशी आहे. काही दिवसांआधी एका व्यक्तीने पोलिसांना या वादग्रस्त पोस्टविषयी माहिती दिली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.