<b>घर स्वप्नातच: मुंबई-ठाण्यातील घरं आणखी महागली</b>

नववर्षाच्या स्वागताच्या आनंदात असलेल्या मुंबईकरांच्या खिशाला चाट लावणारी ही बातमी... नवीन वर्षात मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील घरे तब्बल २० ते ३० टक्क्यांनी महागणार आहेत.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 1, 2014, 08:43 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
नववर्षाच्या स्वागताच्या आनंदात असलेल्या मुंबईकरांच्या खिशाला चाट लावणारी ही बातमी... नवीन वर्षात मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील घरे तब्बल २० ते ३० टक्क्यांनी महागणार आहेत.
एकीकडे मंदीमुळं रिअल इस्टेट क्षेत्राचे कंबरडे मोडले असताना, सरकारनं दरवर्षीप्रमाणे यंदाही रेडी रेकनरचे दर वाढवल्यानं घरं महागली आहेत.
रेडी रेकनरच्या दरात किती वाढ झालीय- पाहा
 मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील घरे २० ते ३० टक्क्यांनी महाग
 रेडी रेकनरच्या दरात झाली २० ते ३०टक्के वाढ
 दक्षिण मुंबई, वांद्रे पाली हिल, अंधेरी, पार्ल्यात सर्वाधिक वाढ
 ७३६ विभागात २० टक्के, २६ विभागात ३० टक्के दरवाढ
 आजपासून नवीन रेडी रेकनर दर लागू
 मुंबई-ठाण्यातील घरे आणखी महागली

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.