www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुख्यमंत्री पृथ्वारीज चव्हाण यांनी आज एक महत्त्वाची घोषणा केली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यंदाचा प्रजासत्ता दिनाचा मुख्य शासकीय सोहळा शिवाजी पार्क ऐवजी मरीन ड्राईव्हवर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यादृष्टीने नियोजनाच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
मरीन ड्राईव्हवर होणाऱ्या कार्यक्रमास हवाई दलाच्यावतीनं आणखी जादा संचलन पथकं, बँड पथकं, हवाई प्रात्यक्षिकं यांचा समावेश करण्यात येणार आहे. यात राज्याच्या विविध विभागांचे चित्ररथ सहभागी होतील. उत्कृष्ट चित्ररथांना प्रथम पारितोषिक ५० लाख, द्वितीय २५ लाख आणि तृतीय पारितोषिक म्हणून १५ लाख रुपये देण्यात येणार आहे.
नवी दिल्लीत राजपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या धर्तीवर राज्यात देखील असा सोहळा आयोजित करावा, असा विचार सुरु होता. दरवर्षी हा कार्यक्रम शिवाजी पार्क इथं होतो. हा सोहळा शिवाजी पार्कऐवजी मरीन ड्राईव्ह इथं झाला तर तो अधिक प्रदर्शनीय आणि दिमाखदार होईल, यावर एकमत झाल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.