नाबार्डच्या अध्यक्षांची सरसकट कर्जमाफीला नापसंती

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डच्या मते शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिल्यानं नैतिकतेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 12, 2017, 09:20 AM IST
नाबार्डच्या अध्यक्षांची सरसकट कर्जमाफीला नापसंती title=

मुंबई : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डच्या मते शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिल्यानं नैतिकतेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.  

कर्जपरतफेडीच्या दृष्टीकोनातून विचार केला, तर कृषी कर्ज माफ करणं हे नैतिकतेच्या दृष्टीनं धोकायदायक असल्याचं नाबार्डचे अध्यक्ष हर्षकुमार यांनी म्हटलं आहे.

उत्तर प्रदेश सरकारनं गेल्याच आठवड्यात  36 हजार कोटींचं कृषी कर्ज माफ केलंय.महाराष्ट्र, तामिळनाडू आणि हरयाणातही कर्जमाफीची जोरदार मागणी होत आहे.  याआधी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनीही कर्जमाफीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.