नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलंय. प्रचार रॅली, सभा यांचा धडाका उडालाय.
नवी मुंबई महापालिकेवर गेली 15 वर्ष गणेश नाईक यांची एकहाती सत्ता राखलीय. शहराचा विकास कसा झाला याबाबत झी मीडियानं नागरिकांचा प्रतिक्रिया जाणून घेतल्या. सिडकोनं आराखडाबद्ध असं शहर बांधलं असलं तरी इथे पाणी, मलनिस्सारण, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा महापालिकेच्या अखत्यारीत येतात. पाण्याची समस्या या शहरात नाही, मोरबे धरणासारख्या गोष्टी पूर्ण झाल्याबद्दल नागरिक समाधान व्यक्त करतायेत.
नवी मुंबई शहरात भय नाही, शांतता सलोखा आहे असे मुद्दे नागरिकांनी नमूद केलेत.
ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र, मार्केट, मैदानं, गार्डन, शाळा, महाविद्यालयं या शहरात असल्याने महिला वर्ग आणि तरूणाईने समाधान व्यक्त केलंय.
सायबर सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरातल्या मुलभूत सुविधा अशाच कायम राहण्यासाठी चांगले सत्ताधारी यावेत, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.