दादर स्टेशनवर 'ठकसेन' टॅक्सी ड्रायव्हर

दादर स्टेशनवरून तुम्ही टॅक्सीनं पुण्याला जात असाल... तर ही बातमी नक्की पाहा... इथं तुम्हाला लुटण्यासाठी सापळा रचला गेलाय... कसा, पाहूयात झी मीडियाचा हा खास रिपोर्ट...

Updated: Apr 17, 2015, 11:01 PM IST
दादर स्टेशनवर 'ठकसेन' टॅक्सी ड्रायव्हर  title=

दीपाली जगताप पाटील, प्रतिनिधी : दादर स्टेशनवरून तुम्ही टॅक्सीनं पुण्याला जात असाल... तर ही बातमी नक्की पाहा... इथं तुम्हाला लुटण्यासाठी सापळा रचला गेलाय... कसा, पाहूयात झी मीडियाचा हा खास रिपोर्ट...

दादर रेल्वे स्टेशनबाहेर 'झी मीडिया'चे पत्रकार राकेश ठाकूर यांना आलेला हा धक्कादायक अनुभव... सोमवारी पुण्याला जाण्यासाठी त्यांनी टॅक्सी पकडली. तेव्हा टॅक्सीचालकानं त्यांना कसा हातोहात गंडा घातला. 

राकेश ठाकूर यांना पुण्याला जायचं होतं. ते आणि त्यांच्या होणाऱ्या पत्नीसोबत पुण्याला जाण्यासाठी सकाळी ८ वाजता दादरला आले. तेथून शेअर टॅक्सी पुण्याला जातात. त्यांनी टॅक्सी स्टँडवरील एका ड्रायव्हरला विचारले की पुण्याला जायचं आहे. तो ड्रायव्हर त्यांना म्हणाला हा हम लोकही अॅरेंज करके देते है. त्यांनी त्याला विचारलं, किती पैसे घेणार..त्याने सांगितलं दोघांचे ७०० होतील.. त्यांनी त्याला होकार दिला. त्याने त्याच्या टॅक्सीत बसण्यास सांगितलं. ठाकूर यांनी विचारलं ही टॅक्सी (इको) जाणार... तो म्हणाला 'नाही... आगे से दूसरा गाडी करके देगा...'  दादर स्टेशनवरून त्या टॅक्सीत बसल्यावर ड्राव्हर सोबत टॅक्सीत त्याच्यासोबत त्याचा साथीदारही बसला. 

टॅक्सी पुढे गेल्यावर मध्येच त्याने थांबवली. ठाकूर म्हणाले  क्या हुआ... एकतर त्यांना  पुण्याला जायची घाई होती.. त्याने ब्ल्यू नियॉन लाईट लावला आणि बोलला, साहब ये लो ३०० रुपया और १००० का नोट दे दो... ठाकूर यांच्याकडे १०००च्या पाच नोटा होत्या... त्याच्याकडून ३०० घेतले आणि त्याला ठाकूर यांनी १०००ची नोट दिली... आणि त्याने दिलेली ३०० रुपयांच्या नोटा मोजण्यास ठाकूर यांनी सुरुवात केली. तितक्यात काही कळायच्या आतच त्याने हातचालाखी केली... आणि ठाकूर यांना सांगितलं... साहेब ये तो १०० का नोट है... आणि नोट ब्ल्यू लाईटवर पकडली आणि सांगितलं ये देख लो..
 

ठाकूर यांना काही कळलंच नाही.. ते गांगरले.. त्यांनी ड्राव्हरला सांगितलं.. अरे १००० का नोट दिया..तेव्हा तो दमदाटी करत बोलला..हम क्या झूठ बोल रहे क्या...तेव्हा त्याच्या साथीदार गाडीबाहेर आला आणि बोलला साहब हम झुठ नही बोलते. आणि दमदाटी केली.. ठाकूर होण्याऱ्या पत्नीसोबत होते..आणि जाण्याची घाई होती.. त्यांनी त्याला परत १००० ची नोट दिली.. फसवणूक झाली होती पण पुरावा नसल्याने ठाकूर तेथून पुण्याला दुसऱ्या गाडीने निघून गेले. 

पुण्याहून परतल्यावर त्याच दिवशी संध्याकाळी राकेश ठाकूर यांनी माटुंगा पोलिस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा नोंदवला. नेमकं त्याचवेळी अशाचप्रकारे फसवणूक झालेली आणखी एक अनिवासी भारतीय व्यक्ती तिथं आली. ही मोडस ऑपरेंडी लक्षात येताच पोलिसांनी सापळा रचून संबंधित टॅक्सी चालकाला ताब्यात घेतलं.

काय आहे या टॅक्सी चालकांची हातचालाखी

  • दादर स्टेशनबाहेर टॅक्सी चालक स्वतःहून प्रवाशांकडे जातात

  • या टॅक्सीच्या आतील भागात निऑनच्या लाईट्स लावलेले असतात

  • निऑनच्या रंगीबेरंगी प्रकाशाचा हे ड्रायव्हर फायदा घेतात

  • तुम्ही 500 किंवा 1 हजार रुपयाची नोट दिल्यास हातचलाखी करुन ती नोट बदलली जाते

  • आणि तुम्ही फक्त 100 रुपयाची नोट दिल्याचं भासवलं जातं

  • तु्म्ही कितीही सांगितलं तरीही हे ड्रायव्हर ऐकत नाही.

  • उलट इतर ड्रायव्हरच्या मदतीनं प्रवाशांवर दादागिरी करतात.

याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु केलीय. दादर पूर्व स्टेशनवर पाहणी सुरु झालीय. अशा पद्धतीचा फसवणूकीचा संशय आल्यास प्रवाशांनी पोलिस स्टेशनला तक्रार करण्याचं आवाहन माटूंगा पोलिसांनी केलंय. दरम्यान, तिन्ही आरोपी टॅक्सीचालक आता जामिनावर सुटलेत.  

पोलिसांचा नाकर्तेपणा 
आरोपींविरोधात पुरावा नसल्याचं पोलिस सांगतात, मग पुरावा आणायचा कुणी ?
आरटीओ आणि पोलिसांना चुकवून टॅक्सीचालकांचं हे रॅकेट सुरु आहे का ?
प्रवाशांना आवाहन करणारे पोलिस दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत पुढे काय कारवाई करणार ?

या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता पोलिसांनाच द्यावी लागणार आहेत. पोलिसांनी हातपाय गाळले तर दाद मागायची कुणाकडे?

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.