मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी सुनील तटकरे यांनी फेरनिवड करण्यात आली आहे. तटकरे दुसऱ्यांदा निवडले गेले आहेत.
मुंबई अध्यक्ष आणि महिला आघाडीच्या अध्यक्षपदाबाबत चर्चा होत आहे. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक झाली. संघटनात्मक बदलांवर या बैठकीत चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठकीत तटकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
भास्कर जाधव यांना तत्कालीन मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांना प्रदेश अध्यक्ष पदावरुन बाजुला करण्यात आले होते. त्यानंतर सुनील तटकरे यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. राष्ट्रवादीने पुन्हा एकदा सुनील तटकरे यांच्यावर प्रदेशची जबाबदारी टाकण्यात आली आहे. तटकरे हे शरद पवार यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरेच राहणार, अशी शक्यता होती. यावर एकमत झाले.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला म्हणावे तसे यश मिळाले नव्हते. तसेच अनेकजण अन्य पक्षात गेल्याने सुनील तटकरे यांनी यांना या पदावरुन हटविले जाईल, अशी चर्चा होती. मात्र, पुन्हा त्यांच्यावर विश्वास टाकण्यात आला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.