मुंबईत सुरु होणार नाईट लाईफ ?

मॉडल शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट विधेयकाला केंद्र सरकारने मंजूरी दिल्यावर मुंबईतले हॉटेल्स, मॉल चालकांनी नियोजन सुरु केलंय. इतकंच नाही तर राज्य सरकारलाही त्यांनी नाईट लाईफ झोन बनवण्यासाठीचा एक प्रस्तावही दिलाय. नाईट लाईफ सुरु झाल्यावर को्टयवधीची उलाढाल एका रात्रीत होणार आहे.

Updated: Jul 6, 2016, 09:57 PM IST
मुंबईत सुरु होणार नाईट लाईफ ? title=

मुंबई : मॉडल शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट विधेयकाला केंद्र सरकारने मंजूरी दिल्यावर मुंबईतले हॉटेल्स, मॉल चालकांनी नियोजन सुरु केलंय. इतकंच नाही तर राज्य सरकारलाही त्यांनी नाईट लाईफ झोन बनवण्यासाठीचा एक प्रस्तावही दिलाय. नाईट लाईफ सुरु झाल्यावर को्टयवधीची उलाढाल एका रात्रीत होणार आहे.

सीटी दॅट नेव्हर स्लिप्स....कधीही न थांबणारी, न झोपणारी मुंबई. मुंबईकरांसाठी हे नविन नसलं तरी मुंबई फिरण्यासाठी येणा-या परदेशी नागरिकांसाठी नक्कीच आश्चर्यकारक ठरणार आहे. सध्या मुंबईच्या परदेशी पर्यटनाचा व्यवसाय हवा तसा चालत नाहीय. त्यामुळेच नाईट लाईफ सुरु करण्याची घाई हॉटेल इंडस्ट्रीला झालीय. यासंदर्भातला प्रस्ताव हॉटेल अँड रेस्टॉरंट ऑफ वेस्टर्न इंडियाने सरकारला दिलाय. मुंबईतल्या पाच ठिकाणी प्रायोगिक तत्वावर नाईट लाईफ सुरु करता येईल असं नियोजन संघटनेने केलंय. 
 
काय आहे संघटनेचा प्रस्ताव

पवई, काला घोडा, बीकेसी, इंटरनॅशनल एअरपोर्ट, डोमेस्टीक एअरपोर्ट या पाच ठिकाणी सुरु होणार नाईट लाईफ? रहिवासी परिसर नसलेल्या जागा नाईट लाईफ झोन साठी निवडण्यात आली आहेत. एका बाजूला फुड झोन तर दूस-या बाजूला कल्चरल इवेंटस असं नाईट लाईफ झोनचं स्वरुप करण्यात येईल. पार्कींगची जागा, हॉटेल्सचे लोकेशन, एअरपोर्ट कनेक्टिव्ही याचे सर्वेक्षण केलं गेलंय. 

नाईट लाईफच्या एका रात्रीची उलाढाल 609 कोटी ? 

सध्या भारतात वर्षाला 68 लाख परदेशी नागरिक येतात. त्यातील 18 लाख नागरिक मुंबईत येतात. एअरपोर्ट कनेक्टिव्हीटी असल्याने ते मुंबईत उतरतात. पण ते मुंबईत एक रात्रही थांबत नाहीत. नाईट लाईफमुळे परदेशी पर्यटक एक रात्रही मुंबईत थांबले तर 609 कोटींचा रेव्हेन्यू राज्याला मिळेल. असा हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचा दावा आहे 
 
मुंबईसारख्या ठिकाणी रात्रभर सुरु राहतील अशी हॉटेल्स सुरु करणं सोपं नाही. त्यासाठी मोठी प्रक्रीया आहे. सध्या मुंबईत 1.30 वाजेपर्यंत हॉटेल रेस्टॉरंट सुरु ठेवायला परवानगी आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी 135 परवाने काढावे लागतात. ज्यामध्ये शटरसाठी, चिमणी लावण्यासाठीही परवाने काढावे लागतात. हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये म्यूझिक, गाणी, डीजे लावायचा असेल तर 50 हजार ते 2.5 लाख रुपयांपर्यंत एंटरटेनमेंट टॅक्स द्यावा लागतो. त्यामुळे गेल्या काही वर्षात 850 म्युझिशीअन मुंबईतली हॉटेल्स सोडून गेलेत. 60 स्क्वेअर फूटांचं हॉटेल असल्यास एका गाडीच्या पार्कींगची सोय करणंही बंधनकारक आहे. 

हॉटेल्स २४x७ सुरु ठेवण्यासाठी मोठा खर्च करण्याची तयारी चालकांना करावी लागणारेय. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी संगीत, डिजे याचा वापर करावा लागणारेय. पण सरकारने अटी शिथिल केल्या नाही तर रात्रभर हॉटेल, रेस्टॉरंट चालू ठेवणं नुकसानीचं ठरु शकेल असं हॉटेल चालकांचं म्हणणे आहे. 

मुंबईची नाईट लाईफ ऐंजॉय करण्यासाठी मुंबईकर आणि पर्यटकांना बजेटचाही विचार करावा लागणारेय. त्यामुळे ही गोष्ट वाटतेय तेवढी सोपी नाही.