नागरिकांना गंडा घालणारी नायजेरियन टोळी मुंबईत जेरबंद

बँकेतून बोलत असल्याचे सांगून डेबिड आणि क्रेडिट कार्डचा डेटा गोळा करुन तसेच बनावट लॉटरी, लकी ड्रॉच्या माध्यमातून मुंबईतील नागरिकांना गंडा घालणाऱ्या नायजेरियन टोळीला अखेर कुलाबा पोलिसांनी जेरबंद केले.  

Updated: Dec 12, 2015, 09:45 AM IST
नागरिकांना गंडा घालणारी नायजेरियन टोळी मुंबईत जेरबंद title=

मुंबई : बँकेतून बोलत असल्याचे सांगून डेबिड आणि क्रेडिट कार्डचा डेटा गोळा करुन तसेच बनावट लॉटरी, लकी ड्रॉच्या माध्यमातून मुंबईतील नागरिकांना गंडा घालणाऱ्या नायजेरियन टोळीला अखेर कुलाबा पोलिसांनी जेरबंद केले.  

मायकेल इबेल, उमू उचेना, एमॅन्युअल ओकाफा, अँण्टोनी विसडॉक हे चारही आरोपी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून हा गैरधंदा करत होते. या सर्वांना अटक करण्यात आली आहे. 

काही दिवसांपूर्वी कुलाबा पोलीस ठाण्यात एका फुटबॉल प्रशिक्षकाने फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. बँकेतून बोलत असल्याचे सांगून ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार एका फुटबॉल प्रशिक्षकाने केली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले. 

ही चार जणांची टोळी बनावट वेबसाईट, लकी ड्रॉच्या आधारे लोकांची फसवणूक करत होती. मुंबईतीलच नव्हे तर देश-विदेशातील नागरिकांनाही या टोळीने गंडा घातला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.