मुंबई : दहावीच्या परीक्षा सुरू असतानाच, यावर्षी दहावीच्या परीक्षेत कोणीही नापास होणार नाही अशी घोषणाच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केलीय.
नापास झालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा जून जुलैमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे. त्यातूनही जे परत अपयशी होतील त्यांना करिअर काऊन्सिलिंग दिलं जाईल. त्यांचं कौशल्य बघून त्यांना एक वर्षांच्या कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाणार आहे.
यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही, असं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचं म्हणणं आहे.
पारंपरिक घोकमपट्टीच्या शिक्षण व्यवस्थेला फाटा देऊन विद्यार्थ्यांना समजेल, त्यांच्या जिज्ञासावृत्तीला उत्तर मिळेल असं शिक्षण देण्याचा निर्धारही विनोद तावडे यांनी केलाय.