www.24taas.com, मुंबई
महालक्ष्मी रेसकोर्सचे मैदान सोडण्यासाठी महापालिका नोटीस बजावणार आहे. तसंच मैदान सोडलं नाही, तर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापौर सुनील प्रभू यांनी दिलीय.
रेसकोर्सवर टर्फ क्लबची मुदत उद्या म्हणजेच 31 मे रोजी संपणार आहे. ही जागा महापालिकेनं ताब्यात घेऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचं उद्यान उभारण्याचा विचार आहे. त्यासाठीच महापौर मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहेत.
मुंबईतला महालक्ष्मी रेसकोर्सचा ९९ वर्षांचा भाडेपट्टीचा करार ३१ मे रोजी संपणार असल्यानं रेसकोर्सची जमीन बीएमसीनं ताब्यात घेण्याची मागणी महापौरांनी प्रशासनाकडं केली आहे. सव्वा दोनशे एकरांवर पसरलेल्या रेसकोर्सच्या जागेवर बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक बांधण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.