मुंबई : हजार, पाचशेच्या नोटा मोदींनी चलनातून बाद केल्यानंतर लोकांच्या हातात नवीन नोटा पोहोचवण्याचे जोरदार आणि जलद प्रयत्न सुरूच आहेत.
भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आता एटीएममधून २० आणि ५० च्या देखील नोटा देण्यावर भर देणार आहे.
गर्दी कमी झाल्यानंतर एटीएममधून २० आणि ५० च्या मोटा देणार असल्याचं, एसबीआयच्या चेअरमन अरूंधती भट्टाचार्य यांनी आज सांगितलं.
एटीएममध्ये २० आणि ५० च्या नोटा फार कमी एटीएममध्ये दिल्या जातात, मात्र देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने जर ५० आणि २० च्या नोटा देण्यास सुरूवात केली तर सुट्ट्यांची चणचण भासणे निश्चितच कमी होणार आहे.