आता राज्यातील सर्व शहरांचे  विकास आराखडे इंग्रजीसोबत मराठीतही

राज्यातील सर्व शहरांचे  विकास आराखडे इंग्रजीसोबत मराठीतही प्रसिद्ध करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत. या सर्व प्रक्रियेला सहा महिन्यांची मुदत देण्यात आलीय. 

Updated: Sep 28, 2016, 06:57 PM IST
आता राज्यातील सर्व शहरांचे  विकास आराखडे इंग्रजीसोबत मराठीतही title=

मुंबई : राज्यातील सर्व शहरांचे  विकास आराखडे इंग्रजीसोबत मराठीतही प्रसिद्ध करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत. या सर्व प्रक्रियेला सहा महिन्यांची मुदत देण्यात आलीय. 

राज्यातली जनता मराठी भाषिक असून प्रत्येक नागरीकाला विकास आराखड्यात नेमके काय मुद्दे आहेत हे समजलं पाहिजे. 

त्यामुळे हे सगळे आराखडे इंग्रजीसोबत मराठीतही असले पाहिजेत अशी मागणी करणारी जनहित याचिका संतराम तराले यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती.

 त्यावर कोर्टानं हा निर्णय घेतला आहे. दरम्यान ही प्रक्रिया सुरु करण्यात आली असल्याची माहिती राज्य सरकारनं हायकोर्टाला दिली. त्यावर ही सगळी प्रक्रिया सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश देत कोर्टानं याचिका निकाली काढली.