www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत एका कुटुंबात एक कार असं धोरण राबवता येईल का याबाबत हायकोर्टानं आरटीओला सूचना केलीय. मुंबईतली ट्रॅफिक जामची समस्या आणि कार पार्किंगची समस्या यामुळं सुटू शकेल असं कोर्टानं आरटीओला म्हटलंय.
मुंबईत वाढत्या वाहनांमुळं प्रदूषणाची समस्य़ाही वाढतेय. `एक कुटुंब एक कार` या धोरणामुळं प्रदूषणाच्या समस्येवर थोड्या फार प्रमाणात नियंत्रण मिळवणं शक्य होईल, असं कोर्टानं आरटीओला म्हटलंय. आरटीओ जनतेच्या सेवेसाठी आहे, असं असताना कार घेणाऱ्यांना पार्किंगबाबत विचारणा का करत नाही असे खडे बोलही कोर्टानं सुनावलेत.
ठाणे आणि भिवंडीत वास्तव्याचा पत्ता दाखवून मुंबईतले लोक जकात कर चुकवून कार मुंबईत आणतात. त्यामुळं महापालिकेचा महसूल बुडतो.. त्यामुळं अशा वाहनचालकांवर कारवाई करुन दंड आकारावा अशी जनहित याचिका हायकोर्टात करण्यात आली होती.. त्या दरम्यान हायकोर्टाने आरटीओला या सूचना केल्यात..
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.