मुंबई : ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, राज्य सरकारचा कोणीही प्रतिनिधी उपस्थित नव्हता.
गेली सात दशकं मराठी मनाला प्रेम शिकवणारे ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकरांचं आज निधन झालं. ते ८६ वर्षाचे होते.
अधिक वाचा : 'पद्मभूषण' मंगेश पाडगावकर यांचं निधन
कवितांच्या जगात वावरताना सारं आयुष्य साहित्यासाठी वाहून घेतलेल्या या कवीच्या जाण्यानं साहित्य विश्वावर शोककळा परसरलीय. सायनच्या स्मशानभूमीत दुपारी साडेचार वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अधिक वाचा : पाडगावकरांच्या निधनावर राजकीय वर्तुळातून 'ट्विटर'वर हळहळ!
यावेळी पाडगावकर याच्या कुटुंबियांसह रामदास भटकळ, अरुण दाते, गंगाराम गव्हाणकर, माजी खासदार एकनाथ गायकवाड़ यांच्यासह साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी हजर होती. मात्र सरकारच्यावतीने अंत्यसंस्काराला कुणीही उपस्थित नव्हतं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगेश पाडगावकरांच्या निधानानंतर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मंगेश पाडगावकरांच्या जाण्यानं महाराष्ट्राचे वैभव हरपलं, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.