मुंबई : विद्यार्थीच्या प्रवेशावरुन भाजपचे शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यात भर सभागृहात खडाजंगी पाहायला मिळाली.
पनवेलमधल्या कळंबोलीतल्या सुधागड कॉलेजमध्ये ऑफलाईन प्रवेशाच्या प्रकरणातून पुष्पा सूर्यवंशी आत्महत्या केली. याच मुद्द्यावरून आज प्रताप सरनाईकांनी तावडेंवर शरसंधान साधले.
गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याचा आरोप केला. ऑफलाईन प्रवेशात गुणवत्ता डावलली जात असल्याचंही म्हटले आहे. त्यावर विनोद तावडेंनी ऑफलाईन प्रवेशाला अजिबात परवानगी नसल्याचं स्पष्टीकरण दिले. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांबरोबर बैठकही घेणार असल्याचंही तावडेंनी म्हटले आहे.