मुंबई: मुंबईच्या देवनार कचरा डेपोला दुसऱ्यांदा मोठी आग लागली. लागलेल्या आगीमुळे मुंबईच्या उपनगरीय भागांमध्ये धुराचं साम्राज्य पसरलं आहे. या धुरामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊ शकतो असे हवामान खात्यानं सांगितलं आहे.
गुरुवारपासून मुंबईमध्ये धुरकट वातावरण पाहायला मिळत आहे. १४ डिग्रीपर्यंत खालावलेलं तापमान, देवनारच्या डम्पिंग ग्राऊंडमध्ये लागलेली आग, आणि वाढलेलं प्रदूषण यामुळे वातावरणामध्ये हे बदल झाले आहेत.
देवनारमध्ये लागलेल्या आगीमुळे देवनार आणि शिवाजी नगर परिसरातील सरकारी शाळा शुक्रवारी आणि शनिवारी बंद ठेवण्यात आल्या होत्या.