मुंबईत समुद्र किनाऱ्याजवळ हॅलिकॉप्टरला अपघात

मुंबईपासून ८० नॉटीकल मैल अंतरावर पवनहंस कंपनीचं हेलिकॉप्टर क्रॅश झालंय. दक्षिण मुंबईपासून ईशान्य भागाकडे हे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झालंय. 

Updated: Nov 4, 2015, 11:42 PM IST
मुंबईत समुद्र किनाऱ्याजवळ हॅलिकॉप्टरला अपघात title=
संग्रहीत

मुंबई : मुंबईपासून ८० नॉटीकल मैल अंतरावर पवनहंस कंपनीचं हेलिकॉप्टर क्रॅश झालंय. दक्षिण मुंबईपासून ईशान्य भागाकडे हे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झालंय. 

हेलिकॉप्टरमधले दोन्ही पायलट बुडाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. हेलिकॉप्टरमध्ये कोणीही प्रवासी नव्हते. पायलटसाठी नेव्हीतर्फे शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. एक विनाशिका, आयएनएस मुंबई आणि नेव्हीचं हेलिकॉप्टर यांच्या माध्यमातून शोधमोहीम सुरू आहे. 

संध्याकाळी लँडिंगचा सराव करत असताना हा अपघात झाला असून या वेळी हॅलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिक बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हा अपघात समुद्र किनाऱ्या पासून ८० सागरी मैलांवर झाला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.