सहा दिवसात ८४० कोटींची विक्रमी कर वसुली

 केंद्र सरकारने नोट बंदी केल्यानंतर बाद झालेल्या ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटाच्या स्वरूपात राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांमध्ये कराच्या रुपात कोट्यवधी रुपये जमा झाले आहेत. 

Updated: Nov 18, 2016, 05:20 PM IST
सहा दिवसात ८४० कोटींची विक्रमी कर वसुली title=

 मुंबई :  केंद्र सरकारने नोट बंदी केल्यानंतर बाद झालेल्या ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटाच्या स्वरूपात राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांमध्ये कराच्या रुपात कोट्यवधी रुपये जमा झाले आहेत. 
 
अनेकांनी कराची रक्कम ही आपल्याकडील ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात भरली त्यामुळे गेल्या सहा दिवसात एकूण ८४० कोटी ६८ लाख रुपयांवर कराची रक्कम जमा झाली असल्याची माहिती नगरविकास विभागाने दिली आहे.  

येत्या २४ नोव्हेंबरपर्यत सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या कार्यालयात जुन्या चलनाने विविध करांचा भरणा आणि थकबाकी स्वीकारण्यात येणार आहे. तरी नागरीकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या मालमत्तांचा कर आणि थकबाकी भरावी, असे आवाहन नगरविकास विभागाने केले आहे.