www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
औषध विक्रेत्यांनी आजपासून आपलं आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे मेडिकल्स दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंतच खुली राहणार आहेत. केमिस्ट एण्ड ड्रगिस्ट असोसिएशननं हा निर्णय घेतलाय.
अन्न आणि औषध प्रशासनाच्या विरोधात या असोसिएशनचं सध्या आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा फटका सामान्य रुग्णांना बसणार आहे. औषध दुकानं सुरु असताना पूर्णवेळ फार्मसिस्ट हवा, ही अट अन्न आणि औषध प्रशासनानं ठेवली आहे. या अटीच्या निषेधार्थ केमिस्ट असोसिएशनं हा निर्णय घेतलाय. मात्र, त्यांच्या या निर्णयामुळे रुग्णांची पिळवणूक होणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.