मुंबई : देशभर खादीचा प्रचार, प्रसार आणि उत्पादन करणाऱ्या खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडर आणि डायरीवरून महात्मा गांधी यांचे छायाचित्र हटवून त्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापण्यात आले आहे.
हा प्रकार लक्षात येताच, कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत विलेपार्ले येथील खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या मुख्य कार्यालयात गुरुवारी निषेध आंदोलन केले.
आमचा पंतप्रधान मोदी यांच्या फोटोला विरोध नाही, तर गांधीजींचा फोटो हटवला याला आक्षेप आहे. असे कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे. देशभरात सोशल मीडियावरूनही या फोटोवर आक्षेप घेतला जातो आहे.