www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतल्या माझगाव, भायखळा परिसरात गेल्या मंगळवारपासून दुषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतोय. इथल्या नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडं वारंवार तक्रार करुनही कुठलीही दखल घेतलेली नाही.
दुषित पाण्यामुळं इथल्या शेकडो नागरिकांना उलट्या, जुलाबाचा त्रास सुरु झालाय. या भागात जणू या आजाराची साथ आल्याची परिस्थिती आहे. माझगावच्या लव्हलेनवरील बीआयटी चाळीमध्ये दुषित पाण्याची सर्वाधिक समस्या असून या चाळीतील प्रत्येक घरातील सरासरी एखादी व्यक्ती तरी साथीच्या रोगानं त्रस्त आहे. महापालिकेचे अधिकारी केवळ पाण्याचे नमुने घेऊन गेली आहे.
दुषित पाण्याचा पुरवठा होवू नये यासाठी कुठलीही काळजी प्रशासनाकडून घेतली जात नाहीय. त्यामुळं इथल्या नागरिकांवर पिण्याच्य़ा पाण्याच्या बाटल्या विकत घेण्याची वेळ आलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.