मुंबई : यंदा गणपतीचं आगमन लवकर होतंय. यावर्षी गणेश चतुर्थी 29 ऑगस्टला आहे. त्यामुळे सध्या गणेश मूर्ती बनवण्याच्या कारखान्यात जोरदार लगबग सुरु झालीय.
गणेश शाळांमधली लगबग आता वाढलीय. दरवर्षी साधारणपणे सप्टेंबर महिन्यात मुक्कामाला येणारे गौरीगणपती यंदा ऑगस्ट अखेरीस डेरेदाखल होतायत. मंडळांच्या मागणीनुसार मूर्तींची कलाकृती तयार करणं, रंगरंगोटी अशा कामांना वेग आलाय. ‘जय मल्हार’ फेम रुपातल्या गणेशमूर्तीही यावेळचं वैशिष्ट्य आहेत तर, सिद्धिविनायकाच्या रुपातल्या, पंचमुखी रुपातल्या गणेशमूर्तींना मोठी मागणी आहे, असं मूर्तीकार राजन खातू यांनी म्हटलंय.
गेल्या वर्षीच्या तुलनेत गणेश मूर्तींच्या किमतीत 20 ते 25 टक्यांनी वाढ झालीय. घरगुती गणेशाच्या मूर्ती दीड हजारपासून ते 10 हजारांपर्यंत उपलब्ध आहेत. यात हिऱ्यांनी सजवलेल्या गणपतीच्या मूर्तीला भक्तांची जास्त मागणी आहे. 21 हजारांपासून ते 90 हजार रुपयांपर्यंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तींची किंमत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.