www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुलुंडमध्ये गोकुळ नावाच्या खाजगी रुग्णालयाला आग लागली होती. या आगीत एका डॉक्टरचा होरपळून मृत्यू झालाय. राहुल रुद्रवार असं मृत डॉक्टरचं नाव आहे.
पहाटे चारच्या दरम्यान ही घटना घडली आहे. हॉस्पीटलमधील औषधांच्या दुकानाला प्रथम आग लागल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे. या आगीत हॉस्पिटलची ओपीडी आणि औषधांचं दुकान जळून खाक झालंय.
घटना घडली त्यावेळी हॉस्पिटलमध्ये १४ रुग्ण होते. सर्व रुग्णांना तातडीनं सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्यानं मोठा अनर्थ टळला. शॉक सर्कीटमुळे ही आग लागल्याचा संशय वर्तवण्यात येतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.