महाराष्ट्राचे लाडके आबा अनंतात विलीन

महाराष्ट्राचे लाडके 'आबा' अनंतात विलीन झालेत. आज जन्मगाव अंजनी इथं शोकाकुल वातावरणात साश्रूनयनांनी आबांना अखेरचा निरोप देण्यात आला. 

Updated: Feb 17, 2015, 03:20 PM IST

अंजनी: महाराष्ट्राचे लाडके 'आबा' अनंतात विलीन झालेत. आज जन्मगाव अंजनी इथं शोकाकुल वातावरणात साश्रूनयनांनी आबांना अखेरचा निरोप देण्यात आला. मुलगा मोहित, मुली स्मिता आणि सुप्रिया यांनी आपल्या लाडक्या आबांना मुखाग्नी दिला. 

- महाराष्ट्राचे लाडके आबा अनंतात विलीन


आबांची मुलं स्मिता, सुप्रिया आणि रोहित

- मुलगा मोहितसह कन्या स्मिता आणि सुप्रियाकडून आबांच्या पार्थिवाला मुखाग्नी

- आबांना पोलिसांची मानवंदना, अखेरची सलामी

- आबांच्या अखेरच्या इच्छेप्रमाणे दहावा-तेरावा दिवस होणार नाही
- १९ फेब्रुवारीला अस्थिविसर्जनावेळी विधी होईल

- आबांची पत्नी आणि कुटुंबीय अखेरचं दर्शन घेतांना

- आबांचे कुटुंबीय... थोड्याच वेळात अखेरची सलामी आणि अंत्यसंस्कार
- राणेंचा शोक संदेश, जुन्या आठवणींना उजाळा

- शासकीय दुखवटा , मंत्रालयाचा ध्वज अर्ध्यावर

- २० पोलीस जवानांकडून आबांना अखेरची सलामी
 - अजित पवार, जयंत पाटलांनी दिला आबांच्या पार्थिवाला खांदा

- आबांना निरोप देतांना सर्वांना अश्रू अनावर

 सर्व मोठे नेते अंजनीत दाखल, थोड्याच वेळात अंत्यसंस्कार

- आबांचं पार्थिव अंजनीत त्यांच्या घरी दाखल

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार अंजनीत पोहोचले

- आबांचं पार्थिव अंजनी या त्यांच्या जन्मगावी दाखल

- आबांची अंत्ययात्रा थोड्याच वेळात अंजनी गावात पोहोचणार

- तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आर.आर.आबांचं पार्थिव दाखल

 - आबांच्या निधनाने कुटुंबिय, तासगावकरांना शोक अनावर

तासगाव, सांगली: महाराष्ट्राचे लाडके आबा गेले... आता थोड़्याच वेळात तासगावला त्यांच्या अंत्ययाेत्रला सुरूवात होणार आहे. तासगावच्या मार्केट यार्डला पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. १२ वाजता आबांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येईल. 

आमच्यात आर.आर नाहीत यावर विश्वास बसत नाही - शरद पवार 

मुंबई : आमच्यात आर.आर नाहीत यावर विश्वास बसत नाही, हा तळागाळातला नेता होता. ज्या प्रमाणे यशवंतराव चव्हाणांनी मला राजकारणात मार्गदर्शन केलं, त्याप्रमाणे मी आर.आर. यांच्या पाठिशी होतो. आबांना येणारी प्रत्येक अडचण सोडवण्याचा प्रयत्न सतत करत होतो, असं शरद पवारांनी म्हटलंय.

प्रकृतीची चौकशी केली नाही, असा एकही दिवस गेला नाही
आर.आर. आबांच्या प्रकृतीच्या डॉक्टरांना फोन करून चौकशी केली नाही, असा माझा एकही दिवस गेला नाही. आमच्या राष्ट्रवादी कुटुंबातील ते एक होते, म्हणून प्रत्येक दिवशी कुणी ना कुणी आर.आर पाटील यांच्या भेटीला जात असे.

आबा नैतिकतेचे पाईक
आर.आर.पाटील यांच्याकडून कधीही राजीनामा मागितला नाही, नेहमीच नैतिकतेला साक्ष ठेऊन आबांनी राजीनामा दिला.

आठवण
एकदा त्यांच्या प्रचाराला गेलो होतो, व्यासपिठासमोर खाली गर्दीत काही महिलांमध्ये दोन चेहरे होते, तेव्हा कुणीतरी सांगितलं या कोण आहेत हे माहित आहे का?
मला माहित नव्हतं?, तेव्हा सांगण्यात आलं, एक आबांची आई आणि दुसरी आबांची पत्नी आहे, अतिशय साधी राहणी, उच्च विचार सरणी आबांची होती.

मुलाचं शिक्षण गावाकडेच केलं
आबांनी मंत्र्याला मिळालेल्या बंगल्यात कधी परिवाराला राहायला आणलं नाही, आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवलं. त्यांचे आई-वडिल आजही शेतात काम राबायचे,  असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

गडचिरोलीचं पालकमंत्रीपद स्वीकारलं

आर.आर.पाटील यांनी गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मागून घेतलं होतं. दुर्गम भाग असला, नक्षलवादी भाग असला तरी आर.आर महिन्यातून दोन वेळेस गडचिरोलीचा दौरा करत होते

....................................

छगन भुजबळांना अश्रू अनावर

माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना आर.आर.पाटील यांच्याविषयी बोलतांना अश्रू अनावर झाले. आबा आपल्यातून गेले आहेत यावर अजूनही विश्वास बसत नाही, राष्ट्रवादीचा मोठा आधारस्तंभ गेला. आर.आर.पाटलांचं पार्थिव आज सायंकाळी सहा वाजता राष्ट्रवादी भवनात अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच उद्या दुपारी बारा वाजता तासगावात आबांवर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

....................................

राजकारणातला सच्चा माणूस गेला! - मुख्यमंत्री 

आर.आर.पाटील यांच्या निधनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटलंय, "एक अत्यंत संवदेनशील नेता, राजकारणातला एक सच्चा माणूस, एक उत्कृष्ट संसदपटू आमच्यातून गेला "

महाराष्ट्राच्या लोकांना मोठा धक्का तसेच "आमच्या करता दु:खाचा क्षण आहे, महाराष्ट्राच्या लोकांना मोठा धक्का आहे, आर आर पाटलांनी अजून लोकशाहीची सेवा केली असती, सामान्य जनतेशी ज्याची नाळ जोडली गेली होती, जो सामान्यांचाच विचार करणारा नेता होता".

आबांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार "शासकीय इतमामात आर आर पाटलांवर अंत्यसंस्कार होतील, एक दिवसाचा दुखवटा मी घोषित करतो, महाराष्ट्रावर हा आघात असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. हजर जबाबी नेता दरम्यान, "महाराष्ट्राच्या राजकारणात एवढा हजर जबाबी नेता मी पाहिला नाही. एखाद्या गोष्टीमागचं आर आर पाटील यांचं तत्वज्ञान तेवढाच महत्वाचं असायचं", असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

....................................

आबांविषयी अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

राळेगणसिद्धी : महाराष्ट्राच्या समाजाची देशाची मोठी हानी झाली आहे. एक आदर्श उपमुख्यमंत्री कसा असावा त्यांनी हा आदर्श घालून दिला, असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

"एक आदर्श सरपंच ते मुख्यमंत्री कसा असावा?, हे आर.आर.पाटलांनी त्यांना दाखवून दिलं.
ग्रामविकास मंत्री असतांना आमच्या अनेक वेळा बैठका व्हायच्या, ग्रामसभा, दफ्तर दिरंगाई असे अनेक कायदे केले, अडचणी होत्या, पण त्यांनी कायदे केले", असं अण्णांनी म्हटलंय. 

"आबांनी सर्वसामान्यांची सेवा केली. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो", अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली आहे.

....................................

My thoughts are with Shri RR Patil's family.Am saddened to know of his demise, which leaves a void in Maharashtra politics: PM @narendramodi

— PMO India (@PMOIndia) February 16, 2015

श्री आर.आर.पाटील यांच्या निधनाचे वृत्त हा१फार मोठा धक्का आहे.एक संवेदनशील नेता,उत्कृष्ट संसदपटू व सच्चा माणूस आज आपल्यातून हिरावला गेला आहे.

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 16, 2015

My heartfelt tributes to Shri R.R Patil on his sad demise. We have lost a sensitive leader, great parliamentarian and a true human being.

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 16, 2015

श्री आर. आर. पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील आणि मंगळवारी एक दिवसाचा दुखवटा

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 16, 2015

R R Patil was a grass root worker, his sad demise is my personal & huge loss for Maharashtra politics. My deepest condolences to his family

— Nitin Gadkari (@nitin_gadkari) February 16, 2015

My condolences on the sudden and sad demise of Shri R.R. Patil, a politician par excellence. May the departed soul rest in peace.

— Arun Jaitley (@arunjaitley) February 16, 2015

Really sad to hear about the untimely demise of Shri RR Patil ji, one of the tallest leaders of Maharashtra. Deepest condolences.

— Piyush Goyal (@PiyushGoyal) February 16, 2015

मुंबई : राजकारणातील सर्वसामान्यांचा चेहरा आकर्षणाचा चेहरा ठरलेले आर.आर.पाटील यांचं निधन आज मुंबईतील लीलावती रूग्णालयात निधन झालं. आर.आर.पाटील हे ५७ वर्षांचे होते.

आर.आर.पाटील यांची अनेक दिवसांपासून कर्करोगांशी झुंज सुरू होती, अखेर आर.आर.पाटील यांची प्रकृती अचानकच खालावली आणि आर.आर.पाटील यांचं निधन झालं.

आर.आर.पाटील हे अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून होते. म्हणून महाराष्ट्राचे आबा गेले असा सर्वसामान्यांचा सूर आहे.

आर.आर.पाटील यांची पत्नी आणि मुलगी अजूनही रूग्णालयात आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.