रेल्वे प्रवासी सल्लागार कमिटीवर मोनिका मोरे, सचिनची शिफारस

 विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार कमिटीवर मोनिका मोरेची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी तिचे नाव सुचवले. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोनिका मोलाची कामगिरी  बजावणार आहे.

Updated: Dec 16, 2014, 08:43 AM IST
रेल्वे प्रवासी सल्लागार कमिटीवर मोनिका मोरे, सचिनची शिफारस title=

मुंबई : विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार कमिटीवर मोनिका मोरेची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी तिचे नाव सुचवले. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोनिका मोलाची कामगिरी  बजावणार आहे.

रेल्वे अपघातात आपले दोन्ही हात गमावलेली महाराष्ट्राची धैर्यकन्या मोनिका मोरे ही आता रेल्वे प्रवाशांच्या समस्यांना थेट वाचा फोडणार आहे. विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीमध्ये तिची नेमणूक झाली आहे.

तिचं नाव सुचवलंय ते देखील क्रिकेट लिजंड आणि राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकर यांनी. शहरातल्या प्रत्येक खासदाराला एकेक सदस्य नामनिर्देशित करण्याची मुभा असते. त्यानुसार सचिन यांनी मोनिकाला नॉमिनेट केलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.