'प्लॅटफॉर्मची उंची वाढवायला अजून किती दिवस लागतील'

मुंबईतल्या रेल्वे प्लॅटफॉर्मच्या उंचीवरुन हायकोर्टानं रेल्वेला चांगलंच फैलावर घेतलंय. ट्रेन आणि प्लॅटफॉर्म यामधल्या गॅपमध्ये पडून प्रवाशांचा मृत्यू झालाय किंवा ते जखमी झालेत, अशा घटना जगात कुठे घडतात का? तसंच प्लॅटफॉर्मची उंची वाढवायला अजून किती दिवस लागतील, अशी परखड विचारणा हायकोर्टानं केलीय. 

Updated: Apr 1, 2016, 04:10 PM IST
'प्लॅटफॉर्मची उंची वाढवायला अजून किती दिवस लागतील' title=

मुंबई : मुंबईतल्या रेल्वे प्लॅटफॉर्मच्या उंचीवरुन हायकोर्टानं रेल्वेला चांगलंच फैलावर घेतलंय. ट्रेन आणि प्लॅटफॉर्म यामधल्या गॅपमध्ये पडून प्रवाशांचा मृत्यू झालाय किंवा ते जखमी झालेत, अशा घटना जगात कुठे घडतात का? तसंच प्लॅटफॉर्मची उंची वाढवायला अजून किती दिवस लागतील, अशी परखड विचारणा हायकोर्टानं केलीय. 

प्लॅटफॉर्मची उंची वाढवायला किती वेळ लागेल, याची माहिती पुढच्या आठवड्यापर्यंत सादर करा नाही तर कारवाई करू, असा इशारा कोर्टानं मध्य आणि पश्चिम रेल्वेला दिलाय. तसंच याबाबतीत एकमेकांवर जबाबदारी ढकलू नका, असंही कोर्टानं सुनावलंय. 

गेली चार वर्षं कोर्ट यासंदर्भात फक्त आदेश देतंय, पण त्याची अंमलबजावणी होत नाहीय. पश्मि आणि मध्य रेल्वेवरच्या एकूण 144 रेल्वे स्टेशन्सपैकी फक्त 64 स्टेशन्सवरच्या प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात आलीय.